Prashant Koratkar Attacked । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत याना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरवर (Prashant Koratkar) कोल्हापुरात न्यायालयाच्या आवारातच हल्ला करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे खुद्द वकिलानेच कोरटकर यांच्यावर हा हल्ला केला आहे. आज कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकर यांच्यावर सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी झाल्यानंतर वकिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं? Prashant Koratkar Attacked
प्रशांत कोरटकरला आज शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आणलं होतं. यावेळी कोर्टात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशांत कोरटकरला कोर्टात आणलं. कोर्टात सुनावणीसाठी सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, आणि इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे वकील असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. तर प्रशांत कोरटकरच्या तर्फे सौरभ घाग हे वकील म्हणून उपस्थित होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकरला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीत नेले जात होते. त्याचवेळी एका वकिलाने त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला (Prashant Koratkar Attacked) करण्याचा प्रयत्न केला. ये पश्या… म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरुन बाजुला केलं. या एकूण घटनेनं कोर्टाच्या आवारात खळबळ उडाली.
दरम्यान, प्रशांत कोरटकर यांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. मग यांना पुन्हा कशासाठी पोलीस कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद वकील सौरभ घाग यांनी केला होता. कोरटकर एक पत्रकार आहेत, त्यांचं एक चॅनेल आहे, घरामध्ये ते एकटेच कमावणारे आहेत, असाही युक्तिवाद वकील सौरभ घाग यांनी केला. यादरम्यान, इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्यात कोर्टासमोर तू तू मैं मैं झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे, आता 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे. कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी-कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती.