मध्यरात्री कोरटकर यांना तुरुंगातून दुसरीकडे हलवले!! परंतु कारण काय?

Koratkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांना धमकी आणि छत्रपती शिवरायांबाबत अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे, या चौकशीत अनेक खुलासे त्यांच्याकडून करण्यात आले आहेत. मात्र बुधवारी रात्री अचानक कोरडकर यांना कोठडीतून हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर हे फरार झाले होते. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याचा मागोवा घेत अखेर तेलंगणामधून त्याला अटक केली. पुढे कोल्हापूर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यादरम्यान पोलिसांनी सखोल चौकशी केली. या चौकशीत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना स्वतःच फोन केल्याची कबुली दिली आहे.

म्हणून तुरुंगातून हलवले..

तसेच, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा उडवल्याचेही मान्य केले आहे. फरार असताना तो हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती देखील पुढे आली आहे. महत्वाचे म्हणजे, ही सगळी चौकशी सुरू असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास छातीत दुखू लागल्याची तक्रार कोरटकर याने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि अधिक तपासासाठी इतरत्र हलवले.

दरम्यान, या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर कोरटकर यांनी सुरुवातीला हा संपूर्ण कट असल्याचा दावा केला होता. त्यांचा आवाज एआयच्या मदतीने तयार करून कॉल केल्याचा युक्तिवाद देखील करण्यात आला होता. मात्र, पोलीस चौकशीत कोरटकर यांनी स्वतःच सावंत यांना फोन केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याचा आधीचा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे.

सध्या पोलीस कोरटकर हे फरार असताना कुठे होते? कोणाच्या मदतीने ते लपून राहिले, याची पडताळणी करत आहेत. यासाठी पोलिसांच्या छावण्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत. तसेच, त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणते नवे वेगळे वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.