Pravara River SDRF Boat Accident : बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या SDRF पथकाचीच बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरातील भीमा नदी पात्रातील बोट बुडाल्यामुळे सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना अहमदनगरमधील SDRF च्या बचाव पथकाची बोट बुडाल्याने (Pravara River SDRF Boat Accident) मोठी खळबळ उडाली आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथक नदीपात्रात उतरलं होते मात्र त्यांची बोट उलटल्याने ५ जण बुडाले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेनं नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, याच परिसरात 22 मे रोजी दोघेजणं बुडाले होते. त्यातील एकाच मृतदेह सापडला मात्र दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडत नव्हता. यासाठी आज सकाळी SDRF च्या टीमला बोलावण्यात आलं होतं. SDRF पथक सदर बुडालेल्या मृताचा शोध घेत असताना त्यांचीच बोट उलटली. यामध्ये ५ जण बुडाले. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं. उजनी धरणात बोट बुडाल्याने बेपत्ता झालेल्या सहा जणांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुखःद आहे. तर नदीत बुडालेल्याचा शोध घेताना प्रवरा नदीत बोट उलटून SDRF च्या बचाव पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याची बातमीही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. यातील सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.