शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीवरून आता राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावं भेटीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टाच आणली जात आहे. त्या संदर्भात दोघांच्यात चर्चा झाली असावी. तसेच डॅमेज कंट्रोलसाठीही पवार मोदींना भेटले असावेत,”अशी शक्यता दरेकर यांनी वर्तवली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याबाबत प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. तसेच राऊतांवरही कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबट चर्चा करण्यासाठी महा विकास अगदी सरकारमधील एक जबाबदार व्यक्ती म्हणून पवार यांनी मोदी याची भेट घेतली असावी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री आज ईडीच्या चौकशीखाली आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेही ईडीच्या रडारवर आहरेत. आशियात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पवार यांनी त्यांची भेट घेतली असावॆ, असे दरेकर यांनी म्हंटले.

Leave a Comment