‘सरकार विषयी माझा मनात काय आहे हे माझ्या चित्रपटातुन बाहेर येते’…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया | गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्तास्थापन, राहुल गांधी यांची वक्तव्य, नागरिकत्व सुधारणा कायदा, आंदोलन यासारख्या घडामोडी महाराष्ट्रासह देशभरात घडत आहेत. हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही भावना अभिनेता,दिग्दर्शक प्रवीण तरडेने व्यक्त केली आहे.

 

‘सरकारकडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. अपेक्षा ठेवावी असे वातावरणही महाराष्ट्रात नाही’, अशी प्रवीण तरडेने निराशावादी सुर आळवला. ‘एक शेतकरी म्हणून दिग्दर्शक म्हणून सध्या जे काही चालू हे त्यावर मी नाराज आहे. सरकार प्रत्येक ठिकाणी येणार नाही. काही आशादायी वातावरण नाही.’ तसेच ‘सरकार विषयी माझा मनात काय आहे हे माझ्या चित्रपटातुन बाहेर येते,’ अशी भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment