बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली. या घोषनेनंतर हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी प्रविण तोगडीयायांनी केली.

“अयोध्येतील राममंदिर आंदोलनात विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, महंत रामचंद्र परमहंस, महंत अवैद्यनाथ यांचं मोठं योगदान आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या चारही जणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”, असे तोगडीया म्हणाले.

“उद्धव ठाकरेंना माझं समर्थन”

“उद्धव ठाकरे कुणासोबत सत्तेत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. पण ते हिंदूंसाठी काय करतात. हे महत्त्वाचं आहे. उद्धव यांनी हिंदूत्त्वचं काम करत रहावं. माझं त्यांना समर्थन आहे. जेव्हा भाजपचं कुणी तोंड पहायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेनं हिंदूत्वाच्या मुद्द्यावर भाजपची साथ दिली. आता अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागीतलं तेव्हा भाजपने ते द्यायला हवं होतं”, असा घणाघात प्रविण तोगडीया यांनी केला.

Leave a Comment