सातारच्या व्यावसायिकाची साखरगाठी निघाली परदेशाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढी पाडवा या सणाच्या सुरुवातीपासून होते. गुढी उभारण्यासाठी साखरगाठीला अनन्या साधारण असे महत्व आहे. सध्या साताऱ्यात साखरगाठी तयार करण्यासाठी मिठाई व्यवसायिकांच्यात लगबग सुरु झाली आहे.

सातारचे सुप्रसिद्ध मिठाई विक्रेते राऊत मिठाईवाले साखरगाठी बनवण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. सध्या त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. त्यांच्या साखर गाठ्याना परदेशात चांगलीच मागणी असून दरवर्षी प्रमाणे यंदा ही त्यांची साखर गाठी परदेशाला निघाली आहे. या गाठ्या बनवण्याचा कामाला त्यांच्या मिठाई कारखान्यात वेग आला आहे.

अमेरिका, जपान, कॅनडा, दुबई अशा अनेक परदेशी देशांमध्ये त्यांच्याकडून साखरगाठी तयार करून पाठवल्या जातायंत. महाशिवरात्र झाली कि त्यानंतर साखरगाठी बनवण्याच्या कामाला मिठाई व्यावसायिक सुरुवात करतात. नक्षी काम केलेल्या सागवानी लाकडात साखरेचा रंग बिरंगी पाक ओतून या गाठ्या तयार केल्या जातात.

सध्या मात्र, पूर्वी प्रमाणे सागवानी लाकडावर साखरगाठी बनवण्याची कला लुप्त होत चालली आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच आजचे प्रयागराज मधील कलाकारांना ही साखर गाठी बनवता येते. त्यामुळे त्यांना या गाठ्या बनवण्यासाठी सातारचे राऊत मिठाईवाले दरवर्षी बोलवतात.

महाराष्ट्रसह देशभरात जसा उत्साहात गुडी पाढवा साजरा केला जातो तसाच परदेशात देखील पहिला मिळत आहे. सातारचे मिठाई व्यावसायिक राऊत मिठाईवाले यांच्या साखरगाठीला दरवर्षी प्रमाणे यंदाही मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या कारखान्यात तयार होणारी 80 टक्के साखर गाठी परदेशाला निघाली असल्याची माहिती राऊत मिठाईचे मालक मोहन राऊत यांनी दिली आहे.