पहिला झाला आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

गडचिरोली । जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून त्याची तयारी अंतिम टप्याात आली आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा तालुक्यात होणार आहे.

चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

६ तालुक्यातील 150 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 49 हजार 638 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला 1 लाख 21 हजार 8955 तर पुरूष 1 लाख 27 हजार 741 आहेत. निवडणूकिसाठी 486 प्रभागामधून 1170 जागांसाठी 2815 उमेदवार आपले मत आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2166 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 486 मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य घेवून पोहोचत आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like