अखेर नागरिकत्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपती कोविंद यांनी स्वाक्षरी करत दिली मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणाऱ्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली होती. मात्र, या विधेयकाला विरोध करताना ईशान्य भारतातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

एका वृत्तसंस्थेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचे वृत्त रात्री उशिरा दिले. या कायद्यानुसार, भारताचे शेजारी देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अत्यातारांचे शिकार झालेल्या नागरिकांना भारतात सुलभतेने शरण मिळणार आहे. मात्र, या कायद्यांतर्गत या शेजारी देशांमधील मुस्लीम धर्मीय नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही.

दरम्यान, गेल्या सोमवारी नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले. लोकसभेत वादळी चर्चेनंतर हे विधेयक 311 विरुद्ध 80 अशा फरकाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारकडून हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले. यावेळी राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाले. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते पडली.

Leave a Comment