हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छा पूर्ण झाली, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली असून याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी बोलताना त्यांनी फाळणीनंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर महात्मा गांधी काय बोलले होते याची आठवण करुन दिली.
नागरिकत्व कायद्याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, फाळणीनंतरच्या वातावरणात राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते, तेथे राहण्याची इच्छा नसलेले पाकिस्तानचे हिंदू आणि शीख भारतात येऊ शकतात.” त्यांना जीवनदान देणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. बापूंच्या या कल्पनेचे समर्थन करत अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी वेळोवेळी हे पुढे केले. आपल्या राष्ट्र निर्मात्यांच्या त्या इच्छेचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे नागरिकत्व मिळाल्याचा मला आनंद झाला.