राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘रायगड’ला भेट देणार; छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणार आहेत. भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय.

संभाजीराजे म्हणाले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असंही म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील शिष्टमंडळासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्या भेटी वेळीच त्यांनी राष्ट्रपतींना रायगड याना रायगड दौऱ्याचे निमंत्रण दिल्याचे समजत आहे.

You might also like