राष्ट्रपती पदाची निवडणूक आज : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?? काय आहे राजकीय गणित ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राष्ट्रपती पदाची निवडणूक असून एनडीए कडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू आणि युपीए कडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २१ जुलै ला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि २५ जुलैला शपथविधी पार पडेल. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते ?? आणि कोणाकोणाला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला देशभरातील ४८०९ लोकप्रतिनिधीं मतदान करतील. यामध्ये लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि विविध राज्यांमधील ४०३३ आमदारांचा समावेश आहे. यामध्ये एका खासदाराचे मताचे मूल्य ७०० आहे. त्यांनुसार लोकसभेचे ५४३ + राज्यसभेचे २३३ असे एकूण ७७६ खासदार असून त्यांच्या मतांचे मूल्य ५,४३,२०० एवढे आहे. तर आमदारांच्या मतांचे मूल्य हे त्या त्या राज्यावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचं मूल्य 175, उत्तर प्रदेशातील आमदारांच्या मतांचं मूल्य 208 आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्यातील आमदारांच्या मूल्यानुसार राष्ट्रपती पदासाठी एकूण 10,86,431 मते आहेत.

एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड-

सद्यस्थितीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे या निवडणुकीत जड दिसत आहे. मुर्मू याना उमेदवारी जाहीर केली त्यावेळीच एनडीए कडे जवळपास ५०% मते होती. मात्र आदिवासी समाजातील महिला असल्याने विविध राजकीय व प्रादेशिक पक्षांनी मुर्मू याना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता आहे.

कोणाला कोणत्या पक्षाचा पाठिंबा-

द्रौपदी मुर्मू यांना वायएसआर काँग्रेस, अकाली दल, बिजू जनता दल,अण्णा द्रमुक, बसप, जनता दल धर्मनिरपेक्ष, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा,, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे यशवंत सिन्हा याना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष , डावे पक्ष, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती या पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू याना भरगोस पाठिंबा –

महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू याना जोरदार पाठिंबा मिळाला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार खासदारांसोबतच शिवसेनेने देखील आपला पाठिंबा द्रौपदी मुर्मू याना जाहीर केला होता. त्यामुळे संख्याबळानुसार महाराष्ट्रातून तब्बल १८० आमदारांची मते द्रौपदी मुर्मू याना मिळतील. तर लोकसभा आणि राज्यसभेतील ऐकून सदस्यांपैकी तब्बल ५४ मते मिळतील.

Leave a Comment