आनंदाची बातमी! म्हाडाच्या तब्बल 11 हजार घरांच्या किंमती होणार कमी

Mhada Lottery 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लवकरच, म्हाडा लॉटरीत पडून असलेल्या घरांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. सध्या म्हाडाची अनेक घरे विक्री अभावी तशीच पडून आहेत. त्यामुळे अशा घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

सध्याची स्थिती पाहता मुंबई, पुणे शहरात घरांच्या किमतींचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे लोक जास्त प्रमाणात म्हाडाच्या घरांची मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे म्हाडाची जी घरे विक्री अभावी तशीच पडून आहेत, त्यांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. या घरांच्या किमती कमी केल्यास त्यांची पुन्हा पुनर्विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे विक्री अभावी पडून असलेल्या घरांना मालक मिळेल. तसेच, अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या सुमारे अकरा हजार घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. हा निर्णय म्हाडाचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी घेण्यात आला आहे. कारण सध्याच्या स्थितीला महाडा ला या घरांचे विज बिल पाणीपट्टी भरावी लागत आहे. त्यामुळे याचा फटका म्हाडाला बसत आहे. अशा स्थितीत म्हाडाने या घरांच्या किमती करून त्यांची पुनर्विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.