औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ गावाजवळील जय श्रीराम पेट्रोल पंपचे मॅनेजर अशोक काकडे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वेरुळ येथे पैसे भरण्यासाठी मोटार सायकल वर जात असताना वेरुळ उड्डाणपूला जवळ कोणी तरी मागून धक्का देऊन त्यांना खाली पाडले व यांचेवर भरदिवसा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या जवळील पाच लाख सदोतीस हजार रुपयाची बॅग हिसकावून घेऊन मोटार सायकल वर पळून गेल्याची तक्रार पंपाचे मालक विजय बोडखे यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे दाखल केली.
येथील पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे व त्यांच्या पोलीस टीमने आरोपींचा, ४८ तासात शोध घेऊन त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी मुळे पत्रकार सेवा संघाच्या वतीने गौरव, सत्कार करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातील अनेक गावातील अवैध धंद्याला पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे व टीमने आळा घातला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना वचक बसला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वसंता शिरसाट, गल्ले बोरगावकर यांनी सन्मान केला आहे.
या गौरव सत्कार समारंभात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, पोलीस हेड कॉस्टेबल नवनाथ कोल्हे, पोलीस नाईक यतीन कुलकर्णी,भगवान चारावंडे, कारभारी गवळी, सुहास डबीर, पोलीस शिपाई कृष्णा शिंदे, महिला पोलिस शिपाई रुपाली सोनवणे, चालक हेड कॉन्स्टेबल रामदास दिवेकर, प्रमोद गरड, यांचा सहृदय गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार सेवा संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रंगनाथ जऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व सुरडकर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली जेष्ठ पत्रकार वसंता शिरसाट गल्ले बोरगावकर जिल्हा उपाध्यक्ष, नईम शहा जिल्हा संघटक, अजिनाथ बारगळ तालूका उपाध्यक्ष, सलमान सर,शैफुद्दीन शेख, दिनकर शिरसाट सदस्य, सरपंच दगडू मुऱ्हाडे, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पोलीसांचा गौरव करण्यात आला.