दुसऱ्या बायकोचा पहिल्या बायकोला अभिमान..ही भानगड नक्की काय हाय ते बघाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

असं कुठ असतंय व्हय, पण असतयं आमच्या कराडात दुकानाला नावं ते पण साधसुध नव्हे तर चक्क दुसरी बायको असे असते. कराड तालुक्यातील कोळे गावातील सलुन दुकानदाराने दुसरी बायको जेंन्टस पार्लर असे नाव आपल्या दुकानाला दिले आहे. अमोल सपकाळ याने बायको सारखे व्यवसायावर प्रेम करत असल्याने दुकानाला दुसरी बायको असे नाव दिल्याने नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अन् महत्वाच म्हणजे पहिल्या बायकोला दुसऱ्या बायकोचा अभिमानही वाटतो.

कोळे गावातील अमोल सकपाळ यांचा पारंपारिक सलुन व्यवसाय आहे. अद्यावत साधना सह नुतनीकरण केलेल्या दुकानाला काय नाव द्यावे या विचारता त्यांने दुकानाला दुसरी बायको असे नाव दिले. दुसरी बायको जेंन्टस पार्लर अशा विचित्र नावाची पाटी पाहुन बायकोसह घरातील सदस्यांनी नापसंती दर्शवत विरोध केला होता. दुकान, व्यवसाया प्रति असलेल्या प्रेमातून नाव देत असल्याचे समजवल्यानंतर घरच्यांचा विरोध मावळला. मात्र सैन्य दलातून निवृत झालेल्या अमोल यांच्या वडीलांचा जोरदार विरोध कायम होता. मी बायकोवर जेवढे प्रेम माया करतो तिला जपतो तिच्या सानिध्यात असतो तसाच मी बायकोनंतर घरातून आल्यावर सलून दुकानात व्यवसायाच्या सानिध्यात असतो. दुकान व व्यवसायावर माझे बायको इतकेच प्रेम आहे. माझा संसार यशस्वी चालण्यासाठी दुकान व बायको दोन्हींची गरज असल्याने मी दुकानाला दुसरी बायको नाव दिले. सैनिकांची दुसरी पत्नी बंदुक असते तसे माझे दुकान माझ्यासाठी आहे. कोणी काही म्हणो मी ठाम आहे अशी माहिती अमोल सकपाळ यांनी दिली

पहिल्या बायकोला… दुसऱ्या बायकोचा अभिमान

सुरवातीला दुसरी बायको हे नाव थोडे विचित्र वाटले. माझ्याशी लग्न केल्यामुळे त्यांनी पहिली बायको मला केले व व्यवसायावर प्रेम असल्याने दुकानाला दुसरी बायको नाव दिले. व्यवसाय व बायकोची जबाबदारी महत्वाची असते व ती एकमेकांना पुरक असल्याने ती जबाबदारी त्यांनी यशस्वी निभावली आहे. दुसरी बायको असे दुकानाला नाव दिल्याचा अभिमान वाटत असल्याचे अमोल सपकाळ यांच्या पत्नीने यांनी सांगितले.

दुकानाच्या नावाने गैरसमज, गंमती- जमती 

कराड ढेबेवाडी राज्य रस्त्यावर असणाऱ्या कोळे गावातील प्रवेश द्वारावरच अमोल यांचे दुकान असुन बनपुरी येथील श्रीक्षेत्र नाईकबाला येणाऱ्या भाविक पर्यटकांचे दुकानाच्या नावाची पाटी लक्ष वेधून घेत आहे काही उत्सुक पर्यटक , भाविक फोटो, सेल्फी काढुन घेतात तर काही जण या मागचे कारण विचारुन घेतात तसेच दुकानात केस कापणयासाठी आलेल्या ग्राहकाने फोनवरून समोरच्याला ठिकाण सांगितले असता दुसऱ्या बाजूला ऐकणाऱ्या अनेकांचे गैरसमज गंमती जमती होतात अशी माहिती अमोल सकपाळ यांनी दिली.

Leave a Comment