Wednesday, June 7, 2023

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली.

गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ शेतकरी शहीद झालेत.या शेतकऱ्यांना वीज देऊ केली नाही आणि वर त्यांची “आंदोलनजीवी” म्हणून हे हेटाळणी करत आहेत यावरून या सरकारची हे सगळी कृत्ये म्हणजे शेतकऱ्यांना दाबण्याचे प्रयत्न आहेत असेही गांधी म्हणाल्या.

मोदी सरकारच्या या सगळ्या दृष्कृत्यावरून मला त्या अहंकारी राजाची आठवण येते जो सत्तेच्या मस्तीत मदमस्त झालाय.ज्याला प्रचंड अहंकार चढलाय.पण लक्षात ठेवा ज्या जनतेने तुम्हाला सत्ता दिली तिचं जनता सत्ता खेचून सुद्धा घेऊ शकते.त्यामुळे कधीतरी लोकांच्या प्रश्र्नी संवेदनशील व्हा,असा सल्ला देखील प्रियंका गांधींनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.