हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य, डीपीआयआयटी, स्टील, रोड ट्रान्सपोर्ट मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सना सूट देण्यासही सांगितलं आहे.
कोणतीही अडवणूक न करता देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. ड्रायव्हरर्सनंही दोन शिफ्टमध्ये काम करत योग्य ठिकाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सिलिंडर भरण्याऱ्या कंपन्यांनी २४ तास काम करण्याची तयारी ठेवावी अशी विनंतीही केली आहे. तसेच नायट्रोजन आणि अरगोन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
PM @narendramodi reviews status of oxygen availability to ensure adequate supply in the country
Centre & States are in regular contact and estimates for projected demand have been shared with States as on 20th April, 25th April & 30th April.
Read: https://t.co/GB7KAocU5I
(1/2)
— PIB India (@PIB_India) April 16, 2021
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण परिस्थितीबाबत जाणून घेतलं. ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता होऊ नये यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. पुढचे १५ दिवस १२ राज्यांमध्ये (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान) ऑक्सिजन लागेल’, असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
‘केंद्र आणि राज्यांमध्ये या परिस्थितीबाबत संवाद होत आहे. सध्याच्या परिस्थितीत २० एप्रिल, २५ एप्रिल आणि ३० एप्रिलला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल. ४८८० मेट्रीक टन, ५,६१९ मेट्रीक टन आणि ६,५९३ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा या तारखांना करण्यात येईल’ असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.