Saturday, March 25, 2023

देशात लाॅकडाऊनची घोषणा होणार? पंतप्रधान मोदी 8 वाजून 45 मिनिटांनी साधणार जनतेशी संवाद

- Advertisement -

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 8:45 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

आज पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला होता. तसेच काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी संवाद साधला होता. आता यानंतर 8:45 वाजता जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात लाॅकडाऊनची घोषणा तडकाफडकी घेतली जाणार नाही असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता मोदी कोणत्या योजनेची घोषणा करतात हे पहावं लागणार आहे.