पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता; पृथ्वीराज चव्हाणांची मिम्स शेअर करुन टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशभर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान मोदी पुर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं मिम्स चव्हाण यांनी ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन परफोर्मिंग असेट असल्याचं मिम्स पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहे. ट्विटमध्ये नरेंद्र मोदींचा  फोटो असून त्यामध्ये भारतातील सर्वाेच्च नाकर्ती (बिनकामाची) मालमत्ता असे म्हटलेले आहे. तर काही वेळ अगोदर गंगा नदीत सापडलेल्या कोरोना रूग्णांच्या प्रेतावरूनही भाजपाला टार्गेट केले आहे. नेटकऱ्यांनी यावर समिक्षा नोंदवलेल्या आहेत.

कोरोनाच्या काळात मोदी सरकारवर काॅंग्रेसकडून वारंवारं सोशल मिडियातून हल्ला केला जात आहे. कोव्हीड रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झाली आहे असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन्ही ट्विटीची नेटकऱ्यांनी चांगलीच दखल घेतल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीवरून परदेशातूनही टीका झाली आहे. आता भारतातील सर्वाेच्च नाकार्ती, बिनकामाची मालमत्ता म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

Leave a Comment