व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाब दौऱ्यातील घटनेवरून केली ‘ही’ चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या प्रकारावर त्यांनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून कालच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंजाबचा दौरा केला. यावेळी भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचे होते. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी काहीआंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. यावेळी त्याच्याकडून पंजाब दौऱ्यावेळी घडलेल्या घटनेची माहिती दिली जात आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने लक्ष घालण्याची मागणी करीत राष्ट्रपतींशी ते चर्चा करीत आहेत.

नेमकं काल काय घडलं?

काल मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केले होते.