व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधानांच्या सभेला सर्वच खुर्च्या रिकाम्या? म्हणुनच मोदींनी सुरक्षेचं कारण देत पळ काढला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत कोणतीही गोष्ट घडली कि त्याची जोरदार चरचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर होते. अशात पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या घटनेचीही चर्चा होऊ लागली आहे. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. या घटनेवरून काँग्रेसनेही मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने इंट्राग्रामवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी इंट्राग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यावर “सुरक्षा मी चूक तो बहाणा है, कुर्सिया खाली है इज्जत तो भी बचानी है”, असे लिहले आहे. त्या फोटोमध्ये एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या गाडी आणि सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह अडकलेले दिसत आहेत.

तर दुसऱ्या फोटोत पंतप्रधान मोदी हे ज्या सभेला जाणार होते. त्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या. या रिकाम्या खुर्च्या असल्याचे समजल्यावर कदाचित मोदींनी आपली इज्जत वाचवण्यासाठी हा दौरा रद्द केला असावा, असे काँग्रेसने या दोन्ही फोटोतून सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पंजाब दौरा अचानक रद्द केल्याने या प्रकारानंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तर नड्डा यांच्या टीकेला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावे लागले. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.