मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस- ठाकरे गटात मतभेत; पृथ्वीराजबाबा- संजय राऊतांची वेगवेगळी मते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका अवघ्या २-३ महिन्यावर आल्या असताना राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) ऍक्शन मोड मध्ये आली आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांची भेट घेत आगामी विधानसभेबाबत सखोल चर्चा केली. मात्र जर सत्ता आली तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात मतभेत पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २ वेगवेगळी विधाने केली आहेत. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. तसेच अजूनही मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत एकमत नाही काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कोणीही एकदा चेहरा प्रोजेक्ट करत नाही. आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आम्ही महाविकास आघडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढणार आहोत आणि सत्तेत आल्यानंतर आमचा जाहीरनामा पूर्ण करणार आहे. आपली परंपराच अशी आहे कि निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळते. मग ते मुख्यमंत्रीपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं ते त्या त्या पक्षातील नेते ठरवतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली.

राऊतांचे पृथ्वीबाबाना प्रत्युत्तर-

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भूमिकेबाबत संजय राऊत याना विचारलं असता ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे हे एखाद मत असू शकते. परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिल्लीत चर्चा केल्यात त्यात वेगळं काही ठरलेले असू शकते. पृथ्वीराज बाबा हे जेष्ठ नेते आहेत, पण राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा झाला असते तर अनेक जागांवर आपण भाजपचा पराभव करू शकलो असतो. त्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षांनाही असायला लागतो आणि चेहरा हा सत्ताधारी पक्षाला सुद्धा लागतो. उद्धव ठाकरे हेच चेहरा असावे असं मी म्हणत नाही. परंतु जेव्हा कोणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा देशात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे २ नेते सातत्याने मोदी- शाह यांच्याविरोधात आवाज उठवत राहिलेत. याची शिक्षाही आम्ही भोगली असं संजय राऊतांनी म्हंटल.