आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटीचा निधी : कराड दक्षिणसह चार विधानसभा मतदार संघातील 35 गावांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण सह कराड उत्तर, पाटण विधानसभा व माण तालुका मध्ये 2515-ग्रामीण विकास कार्यक्रमातून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, घारेवाडी, वनवासमाची (खोडशी), गोटे, वारुंजी, रेठरे खुर्द, शेरे, घोगाव, टाळगाव, कालेटेक, किरपे, वाठार, तुळसण, ओङोशी, पवारवाडी-नांदगाव, आटके, कापील-पाचवडवस्ती, कार्वे, गोळेश्वर, मालखेड तसेच कराड उत्तर मधील टेंभू, कोरेगाव, सयापुर, बाबरमाची, पेरले, बेलवडे हवेली, चिखली, नडशी, पार्ले, कोणेगाव, वनवासमाची (सदाशिवगड) तसेच पाटण विधानसभा मधील कुंभारगाव, तांबवे व माण तालुक्यातील देवापुर या गावांमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे.

2515-ग्रामीण विकास कार्यक्रमातून विंग सौख्यदा कॉलनी समोरील सॉमिल शेजारून नदीकडे जाणारा चचेगांव विंग हद्दीवरील रस्तामुरमीकरण व खडीकरण करणेसाठी 25 लाख रु., पोतले येथे कसबेवस्तीतून मळीकडे जाणारा रस्त्यावर साकव पूल बांधणेसाठी 25 लाख, घारेवाडी येथे पोतले ते घारेवाडी कडेजाणाऱ्या खोल ओढ्यावर साकव पूलाच्याबाजूस संरक्षणभिंतीसह रस्ता सुधारणासाठी 25 लाख, येथील एन. एच. 4 हायवे ते जुने गावठाण रस्ता खडीकरण व डांबरीकरण साठी 10 लाख, गोटे येथे अन्नपुर्णाहॉटेल ते (मुस्लिम दफनभूमी) तक्यावस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण 20 लाख, वारुंजी येथे नामदेव काशिनाथ पाटील यांचे घर ते गावविहीरीपर्यंत आर. सी. सी. गटर करणेसाठी 20 लाख, रेठरे खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळेस संरक्षणभिंत बांधणेसाठी 7 लाख, शेरे येथे प्रकाश विलासनिकम यांचे घरापासून ते सुनिल विष्णू निकम यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, घोगाव येथे रा. मा. 144 ते जाधववाडीला जाणारा रस्ता डांबरीकरणसाठी 15 लाख, टाळगाव येथे नाईकबा मंदिर ते नामदेव पाटील शेतापर्यंत रस्ता डांबरीकरण साठी 10 लाख, माण तालुक्यातील देवापूर येथील ग्रामस्थांसाठी 4 युनिट महिला शौचालय व 4 युनिट पुरुष शौचालय बांधणेसाठी 7 लाख, कुंभारगाव येथे चोरगेवाडी व पडवळवाडी अंतर्गत काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लाख, कुंभारगाव येथे समाजमंदिर ते डांगेघर बंदिस्त गटर वकाँक्रीटीकरण करणेसाठी 10 लाख, किरपे येथे नारायण मंदिर ते महादेव मंदिर रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावर साकव पूल बांधणेसाठी 30 लाख, कालेटेक येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लाख, वाठार येथे मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमिस संरक्षणभिंत बांधणेसाठी 20 लाख, तुळसण येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणेसाठी 10 लाख, ओंडोशी येथील राजेंद्र मोरे यांचे घरापासून ते संभाजी मोरे यांच्या शेडापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणसाठी 10 लाख, पवारवाडी (नांदगाव) येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणसाठी 7 लाख, कार्वे येथील वार्ड क्र. 2 मधील मुस्लिम समाज शाहासाहेब बाला दर्ग्यासाठी संरक्षकभिंत बांधणेसाठी 30 लाख, गोळेश्वर येथील राजनक्षत्र प्लाझा ते हिराईनगर रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी 20 लाख.

तर कराड उत्तरमधील टेंभू येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लाख, कोरेगाव येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 7 लाख, सयापूर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणसाठी 7 लाख, बाबरमाची येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण साठी 7 लाख, मालखेड येथे श्रीकांत चरणकर ते पंकज बुरंगे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण 7 लाख, पेरले येथील गावठाण हद्दीपासून ते तुकाईची वाडी बाकोबा रस्ता खडीकरण व डांबरीकरण साठी 20 लाख, बेलवडे हवेलीयेथे प्रशांत पवार यांच्याघरापासून ते गणेश शंकर जाधव घर यांच्या दक्षिणबाजूस भोलाजी भौरू भिसे यांच्याघरापर्यंत कॉक्रीटीकरण साठी 10 लाख, चिखली येथे महादेव मंदिर ते चिखली-निगडी रस्त्यापर्यंत काँक्रीटीकरण व ओढयालगत संरक्षण भिंत बांधणे साठी 20 लाख, नडशी येथे लक्ष्मी मंदिरासमोर सभामंडप बांधणेसाठी 7 लाख, पार्ले येथे संपतराव नलवडे यांच्या घरापासून ते अविनाश पाटील ते दादासाहेब निकम यांच्या घरापर्यंत रस्ताकाँक्रीटीकरण साठी 10 लाख, कोणेगाव येथे प्रकाश भानूदास चव्हाण यांच्या घरापासून ते सभांजी शंकर साळुंखे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणसाठी 10 लाख, वनवासमाची (सदाशिवगड) येथे हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे साठी 8 लाख, दक्षिण तांबवे येथील नरी पाटील वस्ती ते एकेश्वरीमंदिर रस्ता कॉक्रीटीकरण 8 लाख असा एकूण 5 कोटी रुपयांचा निधी 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत निधी मंजूर झाला आहे.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासहित जिल्ह्यातील आणखी तीन विधानसभा मतदारसंघात तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक तितका निधी मिळावा. यासाठी 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत प्रयत्न केला असून तितका निधी मंजूर झाला आहे. या मंजूर विकास निधीतून गावागावांमध्ये विकासकामे सुरु होतील ज्याचा तेथील जनतेला सोयी सुविधा मिळण्यात फायदा होणार आहे.

Leave a Comment