Breaking News | शरद पवारानंतर आता पृथ्वीराज चव्हाणांनाही Income Tax ची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर मोदी सरकारने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कमटॅक्सची नोटीस पाठवली आहे. यापुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात होती. याबाबत स्वत: चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्रला माहिती दिली आहे. चव्हाण यांना इन्कमटॅक्स नोटीस आल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मला दिवाळी भेट म्हणुन नरेंद्र मोदी यांनी इन्कमटॅक्सची नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनाही अशा प्रकारची नोटीस आली होती. इन्कमटॅक्स डिपार्टमंट हे मोदी सरकराचे डिपार्टमंट आहे. विरोधीपक्षातील नेत्यांना अशा प्रकारच्या नोटीसा पाठवल्या जातात. केंद्र सरकारने भाजपच्या कोणत्याही नेत्याला अशा प्रकारची नोटीस आल्याचे ऐकिवात नसल्याचं चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना म्हटले आहे.

विशेष म्हणजे चव्हाण यांना वयैक्तिक उपस्थित राहून आपल्या प्रापर्टीचे निवेदन सादर करावे असे निवेदनात सांगण्यात आले आहे. भाजप आणि मोदी सरकारला आता जे काही करायचे आहे ते ते करतील असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजप अशा प्रकारे आपले खच्चीकरन करत आहे काय असे विचारले असता मी भाजपला उत्तर देणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितले आहे.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/3425853297532073/

Leave a Comment