हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Prithviraj Chavan On Farmer Loan Waiver । सरकारने ठरवलेला हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीत विम्यातून नुकसान भरपाई या दोन गोष्टी जरी सरकारने दिल्या तरी कोणताही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही. पण या २ साध्या गोष्टी सरकारला करता येत नाहीत. जो पर्यंत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही असे मत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. हॅलो महाराष्ट्रच्या विशेष पॉडकास्ट मध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.
शेतमालाला हमीभाव मिळवून देणे केंद्र सरकारची जबाबदारी- Prithviraj Chavan On Farmer Loan Waiver
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतमालाला हमीभाव मिळवून देणे हि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी आयात निर्यात धोरणे मॅनेज केली पाहिजेत. बाजारभाव हमीभावापेक्षा खाली आला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. मग आपोआपच शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून हमीभाव मिळेल. पण केंद्र सरकार हि जबाबदारी पाळत नाही. आंतराष्ट्रीय दबावाखाली येऊन निर्णय घेण्यामुळे बाजारभाव पडत आहेत. दुसरीकडे, कर्जमाफी झाली पाहिजे कारण तुम्ही हमीभाव दिलेला नाही. अवकाळी पाऊसाने होणाऱ्या नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली नाही. बियाण्यांत फसवणूक होते, खतात भेसळ आहे याबद्दल सरकार काही करू शकत नाहीये. अशात शेतकऱ्याने सर्व जबाबदारी स्वतःवर स्वीकारावी हि मागणी योग्य नाही. सरकारने ठरवलेला हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीत विम्यातून नुकसान भरपाई या दोन गोष्टी जरी सरकारने दिल्या तरी कोणताही शेतकरी कर्जमाफी (Prithviraj Chavan On Farmer Loan Waiver) मागणार नाही. पण या २ साध्या गोष्टी सरकारला करता येत नाहीत. जो पर्यंत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही असं म्हणत पृथ्वीराजन चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
आपला देश नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित नाही. पाकिस्तानात गालवानमध्ये आपली माणसं मारली, आज हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात आहे आणि तुम्ही म्हणताय नाही काही, पाकिस्तान म्हणतंय कि आम्ही तुमची सहा विमाने पाडली आणि तुम्ही म्हणताय आम्ही सांगणार नाही काय झाले ते. पराभव झाला तर हे सुद्धा सांगता यायला हवे. चुका झाल्या तर त्या मान्य करून पुढे जायचं असतं पण मोदींची प्रवृत्तीची कुठल्याही पंतप्रधानांशी तुलना न करता येण्यासारखी आहे. मुळात त्यांची लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाहीये असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये थेट मोदींवर हल्लाबोल केला.
भाजपला या देशात पुन्हा वर्णाश्रमावर आधारित व्यवस्था आणायची आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनी जी क्रांती केली ती संपवून टाकायची आहे. ज्या व्यवस्थेमुळे जो देश हजारो वर्ष पारतंत्र्यात होता, ज्या व्यवस्थेने माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, विज्ञानापासून वंचित ठेवलं आणि आपण गुलामगिरीत गेलो ती व्यवस्था संविधान आल्यानंतर बदलली. मात्र भाजपला पुन्हा हजारो वर्ष जुनी गुलामगिरी आणायची आहे असे मत पृथ्वीराज बाबांनी व्यक्त केलं.




