कोरोनाविरोधात पृथ्वीराज चव्हाण फिल्डवर, वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन जागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन कोरोनाबाबत जागृती केली आहे.

देशात लाॅकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय भुमिका बजावावी असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यापार्श्वभुमीवर कराड दक्षिनचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींसमोर आदर्श घालून दिला आहे. चव्हाण यांनी मतदार संघातील वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन कोरोनाबाबत नागरिकांत जागृती केली आहे. कोरोना विरुद्ध चव्हाण फिल्डवर उतरुन लढत असल्याने आता त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. कराड तालुक्यातील ग्रामिण भागात काही कोरोनारुग्ण सापडल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. मात्र चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन नागरिकांना धीर दिला आहे.

दरम्यान, वाड्यावस्त्यांवरुन फिरताना चव्हाण यांनी कोणालाही न भेटता नागरिकांत कोरोनाबाबत जागृती केली आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंर ६ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यातील १ कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला असून बाकिंव्यावर उपचार सुरु आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांची वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन जागृती

Leave a Comment