हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Prithviraj Chavan On Ind- Pak Cease Fire । भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्दविरामाच्या निर्णयावरून काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. युद्धविरामाचा निर्णय झाला कसा? दोन अधिकाऱ्यांशी बोलून कधी युद्धविराम होतो का? सरकार कडून जे स्पष्टीकरण येतेय त्यावर आमचा बिलकुल विश्वास नाही. सरकार खोटं बोलतंय असा आमचा आरोप आहे. असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या युद्धविरामाच्या निर्णयावर ताशेरे ओढले. हॅलो महाराष्ट्रच्या विशेष पॉडकास्ट मध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.
द्विपक्षीय मध्यस्थी तुम्ही का स्वीकारली? Prithviraj Chavan On Ind- Pak Cease Fire
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आयएमएफने जेव्हा पाकिस्तानला कर्ज दिले तेव्हा २५ पैकी २४ देशांनी पाकिस्तानच्या बाजूने मत दिले आणि भारत एकट्याने पाकिस्तानला कर्ज देऊ नये अशी भूमिका घेतली. कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तानने लगेच सैन्यावरील खर्चात २० टक्के वाढ केली. युनाइटेड नेशन्समध्ये अंतकवाद्यांच्या विरुद्ध लढाण्याकरता एक समिती केली आहे. त्याचे उपाध्यक्षपद पाकिस्तानला देण्यात आलेले आहे. हा विषय काश्मीरच्या अगोदर आतंकवादाचा आहे. आता अंतकवादाचा विषयच संपला आणि काश्मीर विषय पुढे आलेला आहे. १९७२ साली इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्यात झालेल्या सिमला करारामध्ये काश्मीर हा आमचा आपआपसातील मुद्दा आहे आम्ही द्विपक्षिय मध्यस्थी स्वीकारणार नाही असे मान्य केले होते. मग ट्रम्पने कशी द्विपक्षीय मध्यस्थी केली आणि तुम्ही का स्वीकारली? असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला. तसेच आज परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या पदावर राहण्याचा बिलकुल अधिकार नाहीये असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका केली.
ते पुढे म्हणाले, पाकिस्तासोबतचं युद्ध मीडियातून लढलं गेलं. यात भारताचा स्पष्ट पराभव झाला. (Prithviraj Chavan On Ind- Pak Cease Fire) काही गोदी मीडियाच्या चॅनल्सने अशा प्रकारे अतिरंजित बातम्या रंगवल्या.. कराची उध्वस्त केले, इस्लामाबाद कॅप्चर केले, मुनीरला पकडून आणलाय. यामुळे भारताची क्रेडिबिलिटी संपली. आज पाकिस्तानची क्रेडिबिलिटी आपल्यापेक्षा जास्त आहे हे फक्त गोडी मीडियाच्या चॅनल्समुळे. त्यावर तुम्ही काही कारवाई करणार आहेत कि नाही? मोदींना मीडियाने मोठा नेता बनवलं पण मोदींचं खरं स्वरूप देशासमोर कधी येईल असं पृथ्वीराजबाबा म्हणाले.
आपला देश नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित नाही. पाकिस्तानात गालवानमध्ये आपली माणसं मारली, आज हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात आहे आणि तुम्ही म्हणताय नाही काही, पाकिस्तान म्हणतंय कि आम्ही तुमची सहा विमाने पाडली आणि तुम्ही म्हणताय आम्ही सांगणार नाही काय झाले ते. पराभव झाला तर हे सुद्धा सांगता यायला हवे. चुका झाल्या तर त्या मान्य करून पुढे जायचं असतं पण मोदींची प्रवृत्तीची कुठल्याही पंतप्रधानांशी तुलना न करता येण्यासारखी आहे. मुळात त्यांची लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाहीये असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये थेट मोदींवर हल्लाबोल केला.




