जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा? दारू विक्रीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सध्या जगातील प्रत्येक सरकारपुढे जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा असा यक्ष प्रश्न आहे. दारू विक्रीतून सरकारला श्वास घेण्यापुरता तरी महसूल मिळेल अशा भावनेतून दारू विक्रीचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आज सोशल डिस्टेनसिंगचे नियम मोडून ज्या प्रकारे सर्वत्र दारू विक्री दरम्यान गर्दी झाली आणि त्या त्या भागात दारू विक्री बंद करण्यात आली. त्यामुळे जर सोशल डिस्टंसिंगचे नियम पळून दारू विक्री होणार असेल तरच ती होऊ द्यावी असे माझे वैयक्ति मत असल्याचे राज्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्रच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

राज्य शासनाने कोरोनाच्या प्रभावीत क्षेत्रानुसार झोन केले आहेत. त्यानुसार रेड, ग्रीन, व ऑरेज झोनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील केले आहे. याचा एक भाग म्हणून काही भागात शासनाने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. दारू विक्री करताना गोंधळ झाला आहे. मात्र आजची गर्दी पाहिली तर सोशल डिस्टनिंग पाळले गेले नाही. जर सोशल डिस्टनिंग पाळले तरच दुकाने सुरू ठेवावीत असे चव्हाण म्हणाले.

एका बाजूला आपल्याला दारुवरचा कर हवा आहे. आपल्या राज्यात आपण दारू बंदी केलेली नाही. महाराष्ट्रात दारू विक्रीला परवानगी आहे. मात्र सध्या दारू विक्री सुरु करताना थोडा गोंधळ झालेला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी दोन दिवसांचा अवधी दिला असता तर ओनलाईनची वगैरे व्यवस्था उभी करता आली असती. आणि आज जो गोंधळ उडाला तो झाला नसता असं चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, दारू विक्रीतून सरकारला थोडा फार महसूल मिळतो. मात्र यातून फार मोठी अपेक्षा करणे चुकीचे आहे. राज्यात दारू बंदीबाबत समाजामध्ये वेगवेगळी मते आहेत. यानुसार काही समाजिक संघटना दारूबंदीचा आग्रही धरत आहेत. मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र याबाबत शेवटी शासनालाच निर्णय घ्यावा लागेल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

You might also like