ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी

स्वातंत्र्यसेनानी भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित कराडमध्ये जीके गुजर मेमोरियल ट्रस्टकडुन स्वतंत्र्यसैनिक व वारसांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बीडमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने भाई गुजर यांनी स्वातंत्र्यलढयात काम केले होते. त्यांचा या भागात आदरयुकत दरारा होता’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाई गुजर यांचा गौरव केला. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

१२ मार्च रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment