कराड | तक्रारदाराच्या भाचीचा कुणबी असल्याचा दाखल्याचे काम संबंधित अधिकार्याकडून करून देतो असे सांगून 50 हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कराड तहसील कार्यालयातील लोकसेवकावर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम वसंत शिवदास (वय 43, मूळ रा. मालखेड, ता. कराड, सध्या रा. ढेबेवाडी फाटा मलकापूर, ता. कराड) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, तक्रारदार यांचे भाचीचा तहसीलदार कार्यालय येथील संबंधित यांना सांगून कुणबी जातीचा दाखला काढून देतो असे सांगून स्वतःकरीता व संबंधित अधिकारी यांचे करीता 50 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्या अनुषंगाने त्याच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुजय घाटगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार संजय कलगुडगी, धनंजय खाडे, प्रितम चौगुले यांनी केली.