Private Railway Station In India : देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन!! मिळतात या खास सुविधा

Private Railway Station In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Private Railway Station In India । भारतात रेल्वेचे जाळे प्रचंड आहे. कमी पैशात आणि आरामदायी प्रवास होत असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. महत्वाची बाब म्हणजे रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. मागच्या काही वर्षात तर रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत ट्रेन, नमो भारत एक्सप्रेस, मेट्रो ट्रेन, मोनोरेल अशा नवनवीन आणि आधुनिक ट्रेन रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. दुसरीकडे अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून अनेक रेल्वे स्थानकांचाही चेहरामोहरा बदलला आहे. खरं तर भारतीय रेल्वे आणि स्टेशन्स हे केंद्रीय रेल्वे मंत्रालय अर्थात केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात. परंतु देशात असेही एक रेल्वे स्थानक आहे जे खासगी आहे. हे रेल्वे स्टेशन नेमकं कुठे आहे? यामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ते आपण जाणून घेऊयात.

देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन (Private Railway Station In India) हे काय मुंबई, पुणे दिल्ली किंवा कोलकाता सारख्या मोठ्या शहरात नाही तर भोपाळ मध्ये आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशन असं या स्थानकाचे नाव आहे. हे स्टेशन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत चालवले जात आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास बन्सल ग्रुपने भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ (IRSDC) च्या सहकार्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी हबीबगंज रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यानंतर या स्थानकाचे नामांतर राणी कमलापती रेल्वे स्टेशन केलं. स्टेशन कोड सुद्धा HBJ वरून RKMP मध्ये बदलण्यात आला.

कोणकोणत्या सुविधा मिळतात ? Private Railway Station In India

या रेल्वे स्टेशनवर 5 प्लेटफॉर्म, 6 ट्रॅक आहेत. पुनर्विकास केल्यानंतर अगदी विमानतळासारखी सुविधा याठिकाणी पाहायला मिळते. रिटेल दुकाने, फूड कोर्ट/कॅफे, आरामदायी वेटिंग लाऊंजसारख्या सुविधा या रेल्वे स्टेशनवर मिळतात. एस्कलेटर्स, लिफ्ट, ट्रॅव्हेलेटर; ब्रेल टाईमटेबल, दिव्यांगांसाठी सुविधा देण्यात आल्यात. सुरक्षेसाठी 160 CCTV कॅमेरा, SCADA स्वयंचलित मॉनिटरिंग, अग्नि सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत. तसेच 300 कार, 850 दुचाकींसाठी भलीमोठी जागा आहे. हे रेल्वे स्थानक खाजगी कंपनीकडून चालवले जात असले तरी, मालकी भारतीय रेल्वेकडेच राहते हे मात्र याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे.