खासगी शाळा चालकांनो शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी कराल तर दखल घेवू : खा. छ. उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरोनाचा काळ लवकरच जाईल, याचा विचार खाजगी शाळा चालकांनी करुन केवळ शैक्षणिक फी किवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणूक करु नये. पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणा-यांना यथोचित सहकार्य करावे. मात्र जर का कोणी शाळाचालक कोरोना काळात पालकांची आणि पाल्यांची शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी करत असेल तर त्याची आम्ही वेळीच दखल घेवू, असा इशारा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. दरम्यान, फीबाबत पालकांनी पुकारलेल्या चळवळीला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांसह त्यांचे पाल्य यांच्या संयुक्त प्रयत्नांतून खाजगी शाळा आपले नाव उंचावण्यासाठी करत नेहमीच प्रयत्न
असतात. त्यामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा अनन्यसाधारण आहे. वाटा तथापि सध्याचा काळ हा अत्यंत खडतर आहे. संपवणारा हा कोरोना माणुसकी काळ शिक्षणाच्या संबंधीत सर्वांचीच परिक्षा पाहणारा आहे. त्यामुळे संस्था चालकांनी शिक्षकांना सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेच्या व वेळप्रसंगी स्वतःच्या राखीव निधीमधून शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधन-पगार वेळचेवेळी पालकांशी समन्वयातून करावेत. आत्ताची परिस्थिती समजून घेवून, पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा. सातारा जिल्ह्यात केवळ शैक्षणिक शुल्काकरता पालकांना जबरदस्ती, अपमानीत करणे किंवा निकाल राखून ठेवणे, पुढील वर्षाचा प्रवेश रखडवणे असले प्रकार होत असतील असे वाटत नाही जर होत असतील तर ते त्वरित बंद करावेत केवळ शुल्क दिले नाही म्हणून पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करणे कोणालाच मान्य होणार नाही. पालकांनीही आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेवून त्यांनी आपल्या पाल्यांमध्ये पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी प्रामाणिकपणे शाळेशी चर्चा करुन, शाळेचीही आर्थिक गैरसोय होणार नाही अशी भुमिका घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काकरता आम्ही नुकसान होवू देणार नाही. याबाबत अशी प्रकरणे हाताळण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथील जनसंपर्क कार्यालयात पालकांनी संपर्क साधावा. योग्य तो तोडगा काढला जाईल, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment