17 ऑक्टोबरपासून सुरु होणार Private Train तेजस; IRCTC ने काय तयारी केली आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीचा हंगाम म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी (Dussehra 2020, Diwali 2020), देशाची पहिली खासगी ट्रेन असलेली तेजस ही रेल्वे ट्रॅकवर धावू शकेल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) रेल्वे मंत्रालयाला तेजसला 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवानगी मागितली आहे तसेच लीज चार्जेज माफ करण्यास सांगितले आहे. तेजस एक्स्प्रेस दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूच्या साथीनंतर 22 मार्चपासून या गाड्यांचे परिचालन थांबविण्यात आले आहे. IRCTC हे खासगी गाड्या चालवते.

तेजस ही खासगी ट्रेन कधी सुरू होईल? IRCTC लवकरच तेजस ही खासगी ट्रेन सुरू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. IRCTC ने याबाबत रेल्वेला पत्र लिहिले आहे. IRCTC ने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच रेल्वेला लीज चार्जेजही माफ करण्यास सांगितले आहे. IRCTC खासगी ट्रेन तेजससाठी दररोज 13 लाख रुपये लीज चार्जेस भरते.

तेजस एक्सप्रेस खास प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये उत्तम खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ड्रिंक विनामूल्य आहेत. IRCTC तेजसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 25 लाख रुपयांपर्यंतचा रेल्वे प्रवास विनामूल्य मिळतो. त्याचबरोबर, उशीर झाल्यास प्रवाश्यांना नुकसान भरपाईही दिली जाते. एक तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 100 रुपये आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर केल्यास 250 रुपये भरपाई दिली जाते.

या मार्गांवर धावतात खासगी गाड्या – देशाची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लखनौ ते दिल्ली मार्गावर धावली. यानंतर अहमदाबाद-मुंबई मार्गावर दुसरी खासगी ट्रेन सुरू झाली. तिसरी खासगी ट्रेन वाराणसीहून इंदूरसाठी सुरु केली गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment