काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीना अटक; उत्तरप्रदेश पोलिसांची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. यानंतर प्रियांका गांधी लगोलग पीडित कुटुबांच्या भेटीसाठी निघाल्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करुन त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या 35 तासांपासून त्या पोलिसांच्या ताब्यात होत्या. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.

You might also like