काँग्रेस नेतेही शिंदेच्या संपर्कात?; प्रियंका गांधी मुंबईत दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सत्तापेच निर्माण झाला आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत वादळ निर्माण झाले आहे. अशात शिवसेनेच्या आमदारानंतर आता काँग्रेसचे काही आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे महत्वाचे विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. त्यामुळे आमदारांसह सर्व हालचालिंवर लक्ष काँग्रेस नेत्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. या दरम्यान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या नुकत्याच मुंबईत दाखल झाल्या आहेत. राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीवर प्रियंका गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणखी वाढत असताना थेट प्रियंका गांधी महाराष्ट्रात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा केली जाऊ लागली आहे. त्यांच्याकडून आज कोणाकोणाची भेट घेतली जाणार याकडेही सर्वांचे ल;लक्ष लागले आहे. प्रियंका गांधी आपल्या खाजगी कामासाठी मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईट घेणार आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे दोन ते तीन तासांचा अवधी आहे. त्यावेळेत त्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठी घेणार आहेत. चर्चेनंतर त्या आपले पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत खाजगी कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.

दुसरीकडे राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामध्ये अजून काही काँग्रेसचे आमदार दाखल होणार असल्याचंही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून पक्षातील आमदाराच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

Leave a Comment