संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’अधिकार; हिजाब वादावर प्रियंका गांधींचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हा प्रकार घडला. दरम्यान, त्याबाबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असे प्रियंका गांधी वाड्रा यांनी म्हंटले आहे.

कर्नाटकातील हिजाबवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला असल्याने याबाबत आज प्रियंका गांधी यांनीही ट्वीट करत मुलींच्या सुरु असलेल्या शोषणावरुन आवाज उठवला आहे. दरम्यान, त्यांनी आज ट्विट करीत “महिलांनी तसेच स्त्रियांनी काय काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानाने दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे, असे म्हंटले आहे.

वादाचे मूळ कारण काय आहे?

जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितले गेले. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली आहे.

Leave a Comment