भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा करत केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतचे एक ट्विट प्रियंका गांधी यांनी करत केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरबाबतच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,”गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय बंदिस्त करण्यात आलं आलं आहे. लाखो लोकंही तिथं अडकली आहेत. 6 महिन्यांपासून आम्ही हे सगळं किती दिवस चालणार हे विचारत होतो ? आता आम्ही देशात अजून लोकशाही बाकी आहे का अशी विचारणा करत आहोत”.

 

गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर खोऱ्यातील शांतता आणि सुरक्षतेच्या कारणाने राज्यातील राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि व्यवसायिकांना नजरकैदेत ठेवलं आहे. यापैकी काही राजकारण्यांची नंतर सुटका करण्यात आली होती. तथापि, जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अद्यापही घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. याच संदर्भात प्रियांका यांनी केंद्र सरकार टीकेची झोड उठवली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment