वृत्तसंस्था । WWE सुपरस्टार शॅड गॅस्पर्ड आपल्या मुलासोबत समुद्र किनारी पोहत असताना अचानक आलेल्या लाटेत वाहून जाऊन बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात शॅडच्या मुलाला वाचवण्यात लाईफगार्ड रक्षकांना यश आले आहे. तो सध्या सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात घडल्यापासून मागील तीन दिवसांपासून शॅडला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू होते. अखेर बुधवारी लॉस एंजलिस येथे त्याचे शव सापडले. शॅड गॅस्पर्ड ३९ वर्षांचा होता. तेथील पोलिसांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. त्याच्या अचानक जाण्याने WWE क्रिडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शॅड गॅस्पर्ड आपल्या १० वर्षांच्या मुलासोबत कॅलिफोर्नियातील वेनिस समुद्रचौपाटीवर स्विमिंग करत होता. त्यावेळी अचानक मोठी लाट आली दोघेही बुडू लागले. अशा परिस्थितीत शॅडने लाईफगार्ड रक्षकांना मुलाला सर्व प्रथम शोधण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शॅडच्या मुलाला लाईफगार्ड रक्षकांनी बुडण्यापासून वाचवले. मात्र, शॅड समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये तो गायब झाला. ही घडना घडली तेव्हा तो समुद्रकिनाऱ्यापासून ४६ मीटर लांब होता. गेल्या तीन दिवसापासून त्याचा शोध सुरु होता.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी लॉस एंजलिस याठिकाणी आम्हाला एका अफ्रिकन-अमेरिकन पुरूषाचे शव सापडले असल्याचे तेथील माध्यमांना सांगितले. या शवाची उंची सहा फुट आणि वजन २४० एवढं वजन असल्याचे सांगितलं. रविवारी आमच्याकडे आलेला बोपत्ता WWEच्या वर्णानुसार हे शव शॅड गॅस्पर्डचे असल्याची दाट शक्यता आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं. त्यानंतर त्या शवाची ओळख पटल्यानंतर ते शव शॅडचेच असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
https://www.instagram.com/p/CAYQPQyp4Qj/?utm_source=ig_web_copy_link
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”