पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा!! रत्नागिरीत युवकाला कपडे फाटेपर्यंत चोपला

Proclamations of Pakistan Zindabad in ratnagiri
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । एकीकडे भारत आणि कट्टर विरोधक पाकिस्तानमध्ये जोरदार युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली असताना दुसरीकडे रत्नागिरीत एका मुस्लिम तरुणाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा (Proclamations of Pakistan Zindabad) दिल्या. या घोषणाबाजीनंतर रत्नगिरीकरांनी सदर तरुणाला चांगलाच चोप दिला. अगदी कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. मोहम्मद असं सदर तरुणाचे नाव आहे. भारतात राहून पाकिस्तानचा पुळका असलेल्या मोहम्मदला चांगलीच अद्दल घडली आहे. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मोहम्मद बदरुद्दीन परकार ( वय २१, मुळ रा. केजीएम प्लाझा गोवळकोट, चिपळूण सध्या रा. महादेवनगर, रत्नागिरी) या तरुणाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पाकिस्तान बद्दल प्रेम दाखवलं. मोहम्मदने बुधवारी रात्री आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअॅपवर पाकिस्तान झिंदाबाद’ असा स्टेट्स ठेवला. तसेच भारतविरोधी व धर्मविरोधी स्टेटस ठेवले. हि गोष्ट त्याचा परिसरात राहणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यानंतर संतापलेल्या तरुणांनी गुरुवारी दुपारी मोहम्मद परकारला जांफूळफाटा येथे बोलावले आणि असा स्टेट्स का ठेवला याबाबत जाब विचारला. आपण आपल्या मनाने पाकिस्तान जिंदाबादचा स्टेट्स ठेवल्याचे मोहम्मदने कबूल केलं आणि तिथेच मग त्याला चोप बसला. हाताचे ठोसे, लाकडाचा वापर करत मोहम्मदाला फटके देण्यात आले. यात तो जखमी झाला.

रत्नागिरीकरांनी चोप दिल्यानंतर जखमी अवस्थेत मोहम्मदला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने दंगा काबू पथकाला पाचारण केले होते. या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ताबा घेतला. शहर पोलिस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह पोलिस पथकही याठिकाणी दाखल झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात देश विरोधी स्टेटस ठेवल्याप्रकरणी मोहम्मद परकार विरोधात भादंवि कायदा कलम ३२४ तसेच १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. मात्र भारतात राहून पाकिस्तानला गोंजारणाऱ्या अशा वृत्तीमुळे नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न तुमच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही.