मुलीच्या लग्नात सव्वा कोटी खर्च केले अन् बायकोला नवं लुगडं नाही? शहाजीबापू पाटील क्लिन बाॅल्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काय झाडी, काय डोंगर या आपल्या रांगड्या भाषेमुळे राज्यभर चर्चेत असलेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील सध्या प्रसिद्धिझोतात आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहाजी पाटील म्हणाले होते, मी पक्षासाठी माझ्या घरादाराची राखरांगोळी केली, माझी बायको पाटलाची सून असून तिला मी साधं लुगडं घेऊ शकलो नाही. त्यावरून प्राध्यापक हरी नरके यांनी सोशल मीडिया वर काही दाखले देत शहाजी पाटील यांनी केलेल्या दाव्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

हरी नरके यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून शहाजी पाटील यांच्या या दाव्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. आधी करमणूक म्हणून ठीक होतं.पण आता रोज उठून माध्यमं ज्यांची कौतुकं करताहेत, ते खरं बोलताहेत का? फॅक्ट चेक कोण करणार? असा सवाल करत हरी नरके यांनी काही दाखले याठिकाणी दिले.

मुलीच्या लग्नात सव्वा कोटी रुपये खर्च केले, पण बायको पाटलाची सून असून तिला नवं लुगडं घेता आलं नाही. मुलीच्या लग्नात दोन लाख लोकांना जेवू घातलं,प्रत्येकाला बिसलेरी बाटल्या पाजल्या” असं एका वाहिनीवरील कट्ट्यावर सांगणारे कायडोंगारहाटेलझाडीफेम बापू आधी काय म्हणाले होते, राजकारणा पायी घरादाराची पार होळी झाली. जो माणूस मुलीच्या लग्नावर सव्वा कोटी रुपये खर्च करतो, त्याच्या बायकोला या लग्नातही नवं लुगडं मिळत नसेल? तुम्हाला हे पटतं?मतदारांना किती मूर्ख समजायचं? अशा शब्दांत हरी नरके यांनी शहाजी पाटील यांना क्लीन बोल्ड केलं आहे.

Leave a Comment