मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालयातील प्राध्यापक संपावर

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील 42 अस्थायी सहाययक प्राध्यापक आज एक दिवसीय सामूहिक संपावर गेले आहेत. शासकीय सेवेत समावेशन करावे या मागणी साठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षे हे अस्थायी सहाययक प्राध्यापक आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र मागणी मान्य न झाल्याने आज अस्थायी सहाययक प्राध्यापकानी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर अंशता परिणाम झाला आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात या डॉकटरानी जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा बजावली आहे.

मागील 5 वर्ष अस्थायी सहाययक प्राध्यापक या ठिकाणी कार्यरत असून, सेवा समावेशन करावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सेवासमावेशन झाले नाही तर अधिवेशना नन्तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. राज्यभरात आज एकूण 500 अस्थायी सहाययक प्राध्यापकानी हे आंदोलन केले आहे.