सातारा तालुक्यातील 26 सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा तालुक्यातील क वर्गातील सहकारी संस्थांच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक पार पाडण्यासाठी या सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थेच्या नोटीस बोर्डांवर दि. 12 मे 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप असतील तर त्यांनी दि. 19 मे 2022 पर्यंत कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उचित त्या पुराव्यासह लेखी स्वरुपात द्याव्यात. या नंतर निर्धारी पुढील कार्यक्रम सुरु करण्यात येईल, असे तालुका सहकारी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सातारा तालुका शंकर पाटील यांनी सांगितले आहे.

क वर्गातील सहकारी संस्था पुढील प्रमाणे. श्री धनवर्धीनी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. अतित, प्रकाशरावजी वसंतदादा पाटील सहकारी पतसंस्था मर्या. वर्ये, शिवझुंज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गोडोली, स्वातंत्र्य सेनानी किसनराव साबळे पाटील ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शिवथर, सातारा केमिस्ट नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा, कृष्णामाई ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. संगममाहुली, दि सातारा डिस्टि्रक्ट लॉयर्स को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. सातारा, अतित भाग श्रमीक सहकारी पतसंस्था मर्या. अतित, भैरवनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. अपशिंगे सातारा, न्या. रामशास्त्री प्रभुणे सहकारी पतसंस्था मर्या. क्षेत्रमाहुली, विशाल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, संजिवनी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरखळ,

दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, पुण्यशिल सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नागठाणे, दि गुजराथी अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. सातारा, जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, श्री सुवर्ण गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा, शिवशक्ती सहकारी पतसंस्था मर्या. शिवथर, गुरुवर्य ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. अंगापुर, आनंद यांत्रिकी पगारदार नोकरांची सहकारी पतपेढी मर्या. कृष्णानगर, झेड एस इंजिनिअर्स कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. न्यू एम.आय.डी.सी. सातारा, सातारा जिल्हा शासकीय दुध योजना सेवक सहकारी पतसंस्था मर्या. जुनी एम.आय.डी.सी. सातारा, श्री. पांडुरंग कृपा सहकारी ग्राहक संस्था मर्या. पाडळी, शिवराज सहकारी ग्राहक संस्था मर्या. काशिळ, सातारा या संस्थांचा समावेश आहे.

Leave a Comment