Property Investment Tips: गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचं झाले तर आजच्या काळात बरेच गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतात शेअर मार्केट म्युच्युअल फंड विविध बँकांच्या मुदत ठेव योजना पोस्टाच्या योजना एवढेच काय सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे ही सर्वात फायदेशीर बाब मानली जाते. कारण प्रॉपर्टी चे रेट हे शक्यतो कमी होत नाही ते वाढत जातात. त्यामुळे तुम्हाला यातून मिळणारा फायदा देखील मोठा असतो.
आता रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक (Property Investment Tips) करणे हा जोखमीचा देखील विषय आहे. कारण तुम्ही ज्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात तिथल्या अनेक बाबींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तिथला रेट काय आहे ? तिथल्या मूलभूत सुविधा कोणत्या आहेत? या सगळ्या गोष्टींची माहिती असून आवश्यक आहे. जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असताना आपण नीट सारासार विचार करून ती प्रॉपर्टी खरेदी केली नाही तर त्यामधून फायदा होण्याऐवजी तुमचे नुकसान होऊ शकते म्हणूनच आजच्या लेखात आपण प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ? याची माहिती घेणार आहोत.
लोकेशन (Property Investment Tips)
तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता तेव्हा त्या प्रॉपर्टीचं लोकेशन काय आहे? हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण भविष्यात त्या प्रॉपर्टीची मागणी आणि किंमत ही त्या प्रॉपर्टीच्या लोकेशनवर ठरत असते.
प्रॉपर्टी घेताना असे लोकेशन निवडावे जेणेकरून भविष्यात त्या जागेचा दर आणि सुविधा देखील वाढतील शिवाय या ठिकाणापासून असणाऱ्या मूलभूत सुविधा जसे की हॉस्पिटल, शाळा आणि इतर ठिकाण ही ही जवळपास अंतरावर असतील.
पायाभूत मूलभूत सुविधा
तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करणार आहात तिथं वीज , पाणी आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा आहेत की नाही याची काळजी घ्या. जवळपास पार्क, शॉपिंग सेंटर, शाळा, हॉस्पिटल या सगळ्यांची काय सोय आहे? याची देखील माहिती (Property Investment Tips) करून घ्या जेणेकरून जेव्हा तुम्ही भविष्यात ही प्रॉपर्टी विकाल तेव्हा तुम्हाला या प्रॉपर्टी मधून चांगला नफा मिळू शकेल.
कायदेशीर बाबी तपासा
एखादा प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करत असताना कायदेशीर त्याच्या संबंधीच्या बाबी तपासणं खूप महत्त्वाचा आहे एखादा प्रकरण कोर्टात प्रलंबित तर नाही ना याची माहिती करून घ्या मालमत्तेचा शीर्षक स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून योग्य त्या आवश्यक परवानगी घेणे गरजेचे आहे भविष्यामध्ये जर तुम्ही खरेदी केलेल्या प्रॉपर्टी संबंधित कुठलाही प्रकारचे (Property Investment Tips) वाद नसतील तर अशी मालमत्ता पटकन विकली जाते व त्या माध्यमातून नफा देखील जास्त मिळतो.
बिल्डरची व्यवस्थित माहिती घ्या
तुम्ही ज्या बिल्डर करून फ्लॅट खरेदी करणार आहात किंवा ज्या बिल्डरने गृहनिर्माण संस्था उभारली आहे त्या संस्थेत मालमत्ता खरेदी करत असाल तर बिल्डर बाबत किंवा त्याच्या प्रतिष्ठान बाबत जाणून घ्या कर प्रसिद्ध आणि नामांकित (Property Investment Tips) असलेल्या बंदर ने विकसित केलेल्या सोसायट्यांमध्ये मालमत्ता खरेदी करणे फायद्याचे ठरते.
व्यवहाराचे गणित ठरवून ठेवा (Property Investment Tips)
जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर किती वर्षांनी ती विकणार आहात हे तुम्ही आधीच ठरवून ठेवा तुमचे विकण्याचे जे काही टार्गेट असेल त्या अगोदर जर तुम्हाला प्रॉपर्टी विकायची असेल तर होऊ शकणाऱ्या नफा किंवा तोटा तुम्ही विचार करून घ्यावा व प्रॉपर्टी खरेदी करावी.