विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांचे निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद प्रतिनिधी । जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ लेण्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय विमानसेवे अभावी ठप्प झाला आहे .जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असली तरी विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे येऊ शकत नाही केवळ पर्यटनच नाही तर औद्योगिक विकासावर देखील याचा विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत उपस्थित करून हवाई वाहतूक मंत्र्यांना निवेदन दिले.
जेट एअरवेजची सेवा देशभरात बंद झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला बसला आहे औरंगाबाद हुन दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन विमाने रद्द झाल्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक तसेच उद्योजकांची मोठी गैरसोय होत आहे याचा परिणाम पर्यटन व उद्योग व्यवसायावर होत आहे यामुळे बेरोजगारीचे प्रमाण तर वाढलेच पण पर्यटन व्यवसाय व उद्योग देखील संकटात आले आहेत.
मराठवाडा व दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये उद्योगांचे प्रमाण नगण्य आहे असे वेळी व्यवसाय व उद्योगांचे महत्त्व लक्षात घेऊन नागरी उडान विभागाने तातडीने खासगी किंवा एअर इंडियाच्या दिल्ली मुंबई विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.व हवाई वाहतूक मंत्र्यांना विमानसेवा सुरू करण्यासाठी निवेदन दिले.