Propose Day 2024 : तुमच्या प्रिय व्यक्तीला ‘असा’ प्रपोज केलात तर नकार येणारचं नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Propose Day 2024) प्रेमाचा महिना फेब्रुवारी सुरु झाला कि सगळ्यांना ‘व्हेलेंटाईन डे‘चे वेध लागतात. अशातच कालपासून व्हेलेंटाईन वीक सुरु झाला आहे. या गुलाबी आठवड्यातील सगळ्यात खास दिवस म्हणजे ‘प्रपोज डे’. आजचा दिवस प्रेमात पडलेल्या आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी शोधणाऱ्या सगळ्यांसाठी खास आहे. पण प्रेम व्यक्त करायचं म्हणजे छातीत धडधडणे, मनात काहूर माजणे यावर आधी मात करायला हवी.

अशी आयती संधी सोडून बसलात तर कसं चालेल बरं? म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगण्यासाठी काही झकास आयडिया देणार आहोत. यातली एखादी वापरून बघा. म्हणजे तुमचा ‘व्हेलेंटाईन डे’ इतर कपल्स पाहण्यात आणि चणे फुटाणे खाण्यात एकट्याने जाणार नाही.

प्रपोज करायचं म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर मनात बरीच वर्ष दडवून ठेवलेली प्रेमाची भावना व्यक्त करणे. प्रेम हि अत्यंत तरल आणि सुंदर भावना आहे. (Propose Day 2024) जिच्यासमोर शत्रूसुद्धा नमतो. प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात. मग आपल्या माणसाचं मन जिंकता येणार नाही का? त्यामुळे सर्वात आधी प्रेमाला प्रेमाने हाताळा. म्हणजे आजची संधी हुकणार नाही आणि मनातल्या मनात उगाच एखादी खंत तुम्हाला सलणार नाही. चला तर जाणून घेऊयात तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करता येतील असे धीर वाढवणारे सोपे आणि खास पर्याय.

1) शांत, सुंदर निसर्गरम्य किंवा पाण्याजवळील जागा निवडा (Propose Day 2024)

प्रेम व्यक्त करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातील एखाद्या जागेची निवड करा. यामुळे एकतर तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा मूड मस्त राहील. शिवाय शांततेत तुम्ही व्यवस्थित संवाद साधू शकाल. धसमुसळेपणा करून घाई करू नका. निसर्गाचा पूर्ण फील घ्या आणि आपली प्रेम भावना व्यक्त करा. निसर्गातील सुंदर गोष्टींसोबत तिच्या सौंदर्याची तुलना करा. मात्र अतिशयोक्त्ती नको. असे केल्याने तुम्हाला आपल्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत याचा अंदाज येईल. सकारात्मक हालचाली दिसल्यास प्रेमाची कबुली देऊन टाका.

2) सरप्राईज गिफ्ट आणि चॉकलेट्स

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आवडीबाबत आपण आधीपासूनच सतर्क असतो. त्यामुळे आवडता रंग, आवडती जागा, आवडता पदार्थ अशा सगळ्याच आवडत्या गोष्टींची आपल्याला माहिती असते. हि माहिती वापरून आपल्या आवडत्या व्यक्तीला तिची आवडती वस्तू सरप्राईज गिफ्ट म्हणून द्या. (Propose Day 2024) तिच्या डोळ्यातील चमक तुमच्याप्रती न बोलता बरंच काही बोलून जाईल. तुम्ही महागड्या वस्तूंऐवजी स्वतः एखादं DIY गिफ्ट तयार करून दिलंत तर आणखी उत्तम. कधी कधी एखादं फुल किंवा चॉकलेट सुद्धा पार्टनरला आनंदी करत. हि आनंदाची भावना तुमच्या प्रेमाची पहिली पायरी ठरू शकते.

3) कँडल लाईट डिनर डेट

बऱ्याच प्रेमवीरांसाठी कँडल लाईट डिनरची आयडिया कामी आली आहे. त्यामुळे प्रपोज करण्यासाठी कँडल लाईट डिनरचा एक मस्त प्लॅन करा. मेणबत्तीच्या प्रकाशात तिच्या नजरेत नजर घालून ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे हे तिला सांगा. अनेकदा व्यक्त न झाल्यामुळे गाडी अडून राहते. तर असं करू नका. व्यक्त व्हा. मोकळेपणाने तिची तारीफ करा आणि एखाद्या डेझर्ट सोबत किंवा अंगठीने तिला आपल्या मनातील प्रेम भावनेची माहिती करून द्या.

4) फिल्मी डायलॉग आणि शेरो शायरी

तुम्ही तुमच्या पार्टनरला फिल्मी अंदाजात सुद्धा प्रपोज करू शकता. (Propose Day 2024) कधी कधी सोप्या शब्दात न समजणाऱ्या भावना शेरो शायरीतून मन जिंकतात. त्यामुळे काही रोमँटिक बॉलिवूड फिल्म्सचा आधार घ्या आणि हटके अंदाजात प्रपोज करा. याशिवाय अनेक शायर प्रेम या विषयावर भरभरून शायरी करत असतात. त्यापैकी एखादी कदाचित तुमच्या कामी येऊ शकते. जस कि, ‘दिल हथेली पर रखकर, इज़हार-ऐ-मोहब्बत कर रहा हु!! अगर अच्छा लगे हमारा दिल.. तो क़ुबूल कर लेना!!’ किंवा ‘संग तुम्हारे ज़िन्दगी बितानी है!! बस यही मेरे दिल की कहानी है!!’

5) गुलाबी भावनांचं प्रेमपत्र

आता काही केल्या तुम्हाला बोलून व्यक्त होता येत नसेलंच तर मग काय प्रेम पत्र कधीही बेस्ट. तुमच्या मनात तिच्याविषयी काय आहे? कधीपासून आहे? आणि का आहे? हे सुंदर, सौम्य आणि अलंकारिक शब्दात लिहा. गुलाबी रंगाचा कागद, त्यावर अत्तराचा शिडकावा आणि चार पाकळ्या गुलाबाच्या ठेवून प्रिय सखे, अशी सुरुवात करा आणि व्यक्त व्हा! पूर्वी प्रेमपत्राने लव्ह स्टोरी सुरु व्हायची. काय माहित.. हा जुना फॉर्म्युला तुमच्या फायद्याचा ठरेल.

मित्रांनो, या झाल्या करायच्या गोष्टी. आस लावून, ओढाताण करून, जबरदस्तीने प्रेम मिळवता येत नाही. त्यामुळे फंडे, आयडिया, जुगाड करण्यापेक्षा तिचा आणि तिच्या भावनांचा आदर करा. तिला चार चौघात ती इतरांपेक्षा जास्त तुमच्यासाठी महत्वाची आहे याची जाणीव करून द्या. (Propose Day 2024) एकतर्फी समर्पणाची भावना बाळगण्यापेक्षा स्वतः समर्पित होण्याची तयारी दाखवा. तिचा हात हातात घ्या, नजरेला नजर भिडवा, नकाराची चिंता करण्यापेक्षा तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील सगळे चांगले प्रसंग डोळ्यासमोर आणा आणि दिलखुलासपणे व्यक्त व्हा!! यामुळे होकार येईल कि नकार याहून जास्त व्यक्त झाल्याचा आनंद अनुभवालं!!