ईव्हीएम मशीनविरोधात सांगलीत घंटानाद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

लोकशाहीला काळीमा लागू नये व नागरीकांना मानसन्मान मिळावा या करीता ई.व्ही.एम. मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली, इस्लामपूर, मिरज, जत सह अनेक ठिकाणी घंटानाद आंदोलन झाले.

सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयसिंग शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. इस्लामपूर मध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी तहसिल परिसर दणाणून सोडला. याबाबतचे निवेदन नायब तहसिलदारांना देण्यात आले. मिरजमध्ये नानासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर घंटानाद करत मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.

२०१९ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना ई.व्ही.एम. मशीनचा वापर झाल्याने त्यामध्ये लोकप्रतिनीधींना पडलेली मते व मोजलेली मते यामध्ये तफावत आढळली आहेत. निश्‍चीतच इ.व्ही.एम. मशीन न वापरता बॅलेट पेपर वापरून मतदारांना हवा असलेला लोकप्रतिनीधी निवडण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला असून सध्याचे राज्यकर्ते मतदारांचा हक्क हिरावून घेत आहेत. त्यामुळे ई.व्ही.एम.मशीन बंद व्हावे अन्यथा आगामी विधानसभा निवडणूकांवर बहिष्कार टाकला जाईल असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment