पुणे | सुनिल शेवरे
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बमुपा पुणे बाजार समिती मधील अंतर्गत गैरकारभारा विरोधात आदोलन पुकारले आहे.
बाजार समिती परिसरात मटके अड्डे सर्रास चालु असतात अशी तक्रार समोर येत आहे. शिवाय बेकायदेशीर टपऱ्या, वाहतुकिचा गंभीर प्रश्न, कामगारांवर होणारा अन्याय दिवसेंदिवस वाढत आहे. याविरोधात बहुजन मुक्ति पार्टी ने एकदिवसीय आंदोलन केले.
भोंगळ कारभाराच्या विरोधात अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा समिती कोणतीच कारवाई करत नाही आणि गेली अनेक वर्षे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रमुख कार्यालयांत डॉ बाबासाहेबांची प्रतिमा नाही अशी खंत बहुजन मुक्ति पार्टी चे शहर अध्यक्ष शतायु भगळे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली. तसेच बाजार समिती मधील कामगार वर्गाला कायम करून घेण्याची मागणी सुद्धा या वेळी करण्यात आली आहे. बहुजन मुक्ति पार्टी चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन बनसोडे, पुणे शहर अध्यक्ष शतायु भगळे ,रेखा कापसे सुधीर बनसोडे प्रकाश बोलबट जयभिम कांबळे आशा कांबळे आदि. नेते यावेळी उपस्थित होते.
काय आहेत मागण्या –
१ ) बाजार समितीमधील कामगारांना कायम करून घेणे.
२ ) आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बाजार समिती च्या प्रमुख कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नसणे ही सर्वात मोठी शोकांतिका. ती बसविणे.
३ ) वाहतुकिचा गंभीर प्रश्न सोडविणे ( मोठ्या गाड्यांच्या वेळा ठरवाव्यात )
४ ) अवैध धंदे बंद करावे उदा. ( मटके अड्डे , अवैध पान मसाला, गुटखा विक्री )