Monday, February 6, 2023

तहसिलदाराच्या दरवाजाला कुजलेल्या सोयाबीनचे तोरण बांधून निषेध

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पन्नास खाेके…एकदम अोके, या सरकारचं करायचे काय… मिंद्दे सरकार हाय हाय…शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घाेषणा देत सातारा जिल्ह्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नाेंदविला.

सातारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पडलेल्या परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खटाव, माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी वडूज येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन छेडलं.

- Advertisement -

शिवसैनिकांनी शेतात कुजलेली शेतीपिके तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बांधून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदाेलनात सातारा जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्यासह माेठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले हाेते.