औरंगाबाद | दहावीत शिकणाऱ्या दीक्षा शिंदे हिची जगप्रसिद्ध ‘नासा’ या अमेरिकन संस्थेत फेलोशिप वर्च्युअल पॅनलवर पॅनललिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद मध्ये सर्व स्तरातून तिचं कौतुक केले जात आहे. सलग तीन वेळा तिने यासाठी प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.
नासाचे (नॅशनल एरोनॉटिक्स अंड स्पेस अडमिनिट्रेशन) या संकेत स्थळावर तिने प्रथम जून 2020 मध्ये संशोधनपर लेख पाठवला. तो नाकारण्यात आला होता. दुसर्या प्रयत्नातही तिला यश आले नव्हते. पण निराश न होता तिने तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले. सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये तिसऱ्या प्रयत्नात तिची निवड झाली. तिने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा देवाच्या अस्तित्वाचा संबंधित हा लेख पाठवला होता. ज्यात देव नाही असे मांडले होते.
नासा सारख्या जगप्रसिद्ध संस्थेतील मानाच्या पदावर निवड झाल्यावर तिच्या कुटुंबियातील सर्वच खूप आनंदी झाले आहेत. तिला या कामगिरीसाठी घरच्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे असे दीक्षाचे म्हणणे आहे.