पृथ्वी शॉची वादळी खेळी ; अवघ्या 152 चेंडूत कुटल्या 227 धावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही सामन्यात आपल्या खराब प्रदर्शनामुळे संघाबाहेर असलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉने देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना वादळी द्विशतक ठोकलं आहे. पृथ्वी शॉने अवघ्या 142 चेंडूत द्विशतक झळकावलं. नाबाद 227 धावा ठोकणारा पृथ्वी शॉ भारताचा लिस्ट ए मधील सातवा तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील चौथा द्विशतकवीर ठरला.

पृथ्वी शॉच्या द्विशतकामुळे मुंबईने निर्धारित 50 षटकात 4 बाद 457 धावा कुटल्या. पृथ्वी शॉने आपल्या झंझावाती खेळीत 31 चौकार आणि  5 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने 152 चेंडूत नाबाद 227 धावा ठोकल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या कर्णधाराने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबई विरुद्ध पुद्दुचेरी यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ संघाचं नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच नेतृत्त्व करताना, पृथ्वी शॉने पुद्दुचेरीच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like